सोनाक्षी सिन्हा अभिनयाशिवाय ‘या’ क्षेत्रातही करते काम


आज दबंग चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सोनाक्षी सिन्हाचा वाढदिवस असून २ जून १९८७ साली सोनाक्षीचा बिहारच्या पटनामध्ये जन्म झाला होता.

सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी सोनाक्षी फार जाड होती. जवळपास ९० किलोंची ती होती. तिने सडपातळ होण्यासाठी स्वतःवर मेहनतही घेतली. तिच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगला गल्ला कमावला होता. या चित्रपटासाठी सोनाक्षीने तब्बल ३० किलो वजन कमी केलं होतं.

सोनाक्षीने सिनेकरिअरला सुरुवात करण्यापूर्वी कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून काम केले आहे. तिने २००५ मध्ये मेरा दिल लेके देखो चित्रपटासाठी कॉस्ट्यूम डिझाइन केले होते. सोनाक्षी तिच्या आई- वडिलांसाठी आजही कॉस्ट्यूम डिझाइन करते. सोनाक्षीने याशिवाय २००८ ते २००९ मध्ये मॉडेल म्हणून रँप वॉकही केला होता. तिने लॅक्मे फॅशन विकसाठी रँप वॉक केला होता. सोनाक्षीला साड्या नेसायला फार आवडते. याचमुळे ती अनेक चित्रपटांमध्ये साडी नेसलेलीच दिसते.

सोनाक्षी लुटेरा चित्रपटात सुंदर पेन्टिंग काढताना दाखवण्यात आली आहे. खऱ्या आयुष्यातही ती सुंदर पेन्टिंग काढते. फावल्या वेळात तिला चित्र काढणे पसंत आहे. दबंग चित्रपटाच्या यशानंतर सोनाक्षी दबंग २ मध्येही दिसली होती. आता ती पुन्हा एकदा या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात दिसणार आहे. पहिल्या दोन भागांप्रमाणेच या भागातही ती सलमानची पत्नी दाखवण्यात आली आहे.

Leave a Comment