‘स्ट्रिट डान्सर’ पाहायला मिळणार ‘या’ सुपरहिट गाण्याचे रिक्रियेटेड व्हर्जन


आजवर बऱ्याच जुन्या लोकप्रिय गाण्यांचे अनेक हिंदी चित्रपटांमध्ये रिक्रियेटेड व्हर्जन पाहायला मिळाले. नवे स्वरूप जुन्या गाण्यांना देऊन ही गाणी तयार केली जातात. चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रियादेखील या गाण्यांना मिळतात. वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांचा ‘स्ट्रिट डान्सर’ या चित्रपटाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. डान्सवर आधारित हा चित्रपट असल्यामुळे गाण्यांची आणि डान्सची मेजवानी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यामध्ये आता बॉलिवूडच्या एका सुपरहिट गाण्याचे रिक्रियेटेड व्हर्जन पाहायला मिळणार आहे.

‘स्ट्रिट डान्सर’चे दिग्दर्शन रेमो डिसुजा हे करत आहेत. प्रभूदेवाच्याच सुपरहिट ‘हमसे है मुकाबला’ या चित्रपटातील ‘मुकाबला मुकाबला’ या गाण्याचे रिक्रेयेटड व्हर्जन तयार करण्यात येणार आहे. या गाण्यावर वरुण आणि श्रद्धा दोघेही डान्स करताना दिसणार आहेत. ‘मुकाबला’ गाण्याचे रिक्रियेटेड व्हर्जन तब्बल २५ वर्षानंतर तयार करण्यात येणार असून प्रभूदेवाचीदेखील झलक या गाण्यात पून्हा एकदा पाहायला मिळेल.

यासंदर्भात एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, तनिष्क बागची ‘मुकाबला’ गाण्याचे रिक्रियेटेड व्हर्जन करणार आहे. प्रभूदेवाचा ‘स्ट्रिट डान्सर’ चित्रपटात डान्स हा परिस्थितीला अनुरुप असणार आहे. प्रभूदेवाचा डान्स पुन्हा एकदा चाहत्यांवर छाप पाडेल, असा विश्वास टी-सीरिजचे भूषण कुमार यांनी म्हटले आहे.

Leave a Comment