अफ्रिकेचा इम्रान ताहिर विश्वचषक स्पर्धेत अशी कामगिरी करणारा दुसरा गोलंदाज


लंडन – एक मोठा विक्रम विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सलामीच्याच सामन्यात पाहायला मिळाला. काल खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून यजमान इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. दिग्गज फिरकीपटू इम्रान ताहीरने या सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर करत इतिहास रचला आहे.

फिरकीपूट इम्रान ताहीरच्या हातात आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने पहिलेच षटक सोपवले आणि त्याचा विश्वास सार्थ ठरवत ताहीरने सलामीवीर जॉनी बेअरस्टोला आपल्या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर माघारी धाडले. इम्रान हा अशी कामगिरी करणारा पहिलाच फिरकीपटू तर क्रिकेटविश्वातला दुसरा गोलंदाज ठरला आहे. 1992च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यापूर्वी असा विक्रम करण्यात आला होता.

Leave a Comment