चाखला का नरेंद्र मोदी सीताफळ कुल्फीचा स्वाद


लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रचंड बहुमताने विजय मिळविला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लाट देशात किती तीव्र बनली याचे कौतुक सुरु झाले. मोदींचा हा विजय साजरा करण्यासाठी गुजराथच्या सुरत शहरातील सुरत आईसक्रिम पार्लरचे मालक विवेक अजमेरा यांनी खास कुल्फी सादर केली आहे. या कुल्फीचे नाव नरेंद्र मोदी सीताफळ कुल्फी असे आहे.

या कुल्फीचे नाव केवळ नरेंद्र मोदी असे नाही तर तिचा आकार मोदी यांच्या चेहऱ्याप्रमाणे आहे. यासाठी मशीनची मदत घेतलेली नाही तर येथील कुशल कारागिरांनी तो हाताने तयार केला आहे. म्हणजे ही कुल्फी हँडमेड आहे. अश्या २०० कुल्फी बनविण्यासाठी २४ तास लागतात असे सांगितले जात आहे. या कुल्फी मध्ये कोणत्याही रसायनाचा वापर केला गेलेला नसून पूर्ण नैसर्गिक पदार्थांपासून ती बनविली गेली आहे.


ही कुल्फी ३० मे पर्यंत विकली जाणार आहे. ३० मे रोजी मोदी दुसऱ्यावेळी पंतप्रधान पदाची शपथ घेतील त्यानंतर या कुल्फीची विक्री बंद केली जाणार आहे. या कुल्फीला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आणि भाजपचा विजय साजरा करण्यासाठी ही कुल्फी ५० टक्के सवलतीत विकली जात असल्याचे मालक अजमेरा यांनी सांगितले.

Leave a Comment