कैलास पर्वताची न उलगडलेली रहस्ये


जगभरातील गिर्यारोहक दरवर्षी जगातील सर्वात उंचीचे शिखर एव्हरेस्ट सर करण्यासाठी हजारोंच्या संख्येने येतात मात्र देवांचे देव महादेव यांचे निवासस्थान मानल्या गेलेल्या कैलास पर्वतावर आजपर्यंत एकही गिर्यारोहक पोहोचू शकलेला नाही. वास्तविक कैलास पर्वताची उंची २२ हजार फुट आहे आणि एव्हरेस्टची उंची आहे २९ हजार फुटाहून अधिक. तरीही कैलास सर होऊ शकलेले नाही यामागे कैलासाबद्दल आजही न उलगडलेली अनेक रहस्ये कारणीभूत आहेत. अनेक संशोधक, वैज्ञानिक सतत कैलासाबाबत माहिती जमवत आहेत, अनेक चाचण्या करत आहेत तरीही शेकडो वर्षे उलटूनही कैलास अज्ञात राहिला आहे.

याबाबत हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख धर्मग्रंथात माहिती मिळते पण ती अध्यात्मिक स्वरूपाची आहे. या चार धर्मीय लोकांचे कैलास हे श्रद्धास्थान आहे. शिवपुराण सांगणारे जे अनेक ग्रंथ आहेत त्यात कैलासाचे नाव नाही असा एकही ग्रंथ नाही. पौराणिक मान्यतेनुसार कैलास म्हणजे कुबेर नागरी आहे. या पवित्र पर्वताबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने सुद्धा कैलास परिसरात घडत असलेल्या अनेक विचित्र घटना पडताळून पहिल्या आहेत मात्र त्या तश्या का घडतात याचा खुलासा त्यांना करता आलेला नाही.


पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण या दोन धृवांमध्ये हिमालय आहे आणि कैलास हे हिमालयाचे केंद्र मानले जाते. येथे प्रवेश केल्यावर दिशासुचक यंत्रे म्हणजे होकायंत्र काम करत नाही. कैलासावर पुण्यात्मे वास करतात असा समज आहे. एका रशियन संशोधकाने यावर संशोधन करून तिबेटी धर्मगुरूंची भेट घेतली तेव्हा ते म्हणाले कि कैलासाच्या आसपास अलौकिक उर्जाप्रवाह आहे. त्यामुळे तपस्वी त्यांच्या अध्यात्मिक गुरूबरोबर टेलीपथीने संपर्क करू शकतात. हजारो वर्षे भाविक कैलास परीक्रमेसाठी येत आहेत आणि अतिशय खडतर प्रवास करून कैलासाची ५२ किमीची परिक्रमा पूर्ण करत आहेत. मात्र अनेक्ना त्यात यश येत नाही. गिर्यारोहक या पर्वतावर चढू शकत नाहीत. ज्यांनी कुणी तसा प्रयत्न केला ते परतले नाहीत. त्यामुळे आता तर चीनने हे धार्मिक स्थान मानून येथे गिर्यारोहणाला बंदी केली आहे.


पिरामिड आकाराचा हा पवित्र पर्वत नैसर्गिक नाही तर मानवाने बनविलेला आहे असाही एक प्रवाद आहे. हा पर्वत आतून पोकळ आहे आणि त्यातून तीव्र रेडीएशन होते त्यामुळे या परिसरात जादा वेळा थांबता येत नाही असेही सांगितले जाते. येथून सिंधू, सतलज, कर्नाल आणि ब्रह्मपुत्रा अश्या नद्या उगम पावतात. कैलासाच्या पायथ्याशी मानस आणि राक्षस अशी दोन सरोवरे आहेत आणि दोन्ही एका पातळ डोंगराने वेगळी केली आहेत आणि सर्वात विशेष म्हणजे मानस हे गोड्या पाण्याचे सरोवर असून समुद्रसपाटीपासून इतक्या उंचीवर असलेले गोड्या पाण्याचे ते एकमेव सरोवर मानले जाते.


आणखी एक मान्यता अशी आहे कि कैलास हे पृथ्वी आणि अध्यात्मिक जगाला जोडणारा मार्ग आहे. या भागात वय वाढण्याची प्रक्रिया झपाट्याने होते. माणसाची नखे आणि केस दोन आठवड्यात जितके वाढतात ते या भागात १२ तासात वाढतात याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. यामागे येथे असलेली अनोखी उर्जा हेच कारण असल्याचे सांगितले जाते. हिंदूंचे पवित्र प्रतिक स्वस्तिक. कैलासावर रोज सुर्वस्त होत असताना अश्या प्रकारे कैलासावर सावली पडते कि त्यातून स्वस्तिक आकार स्पष्ट दिसतो. अध्यात्मिक गुरु हा प्रकार म्हणजे सुर्व्देवाने शिवाला केलेले वंदन मानतात.

कैलासाला चार बाजू आहेत आणि हिमालयातील कोणत्याच शिखराला अश्या चार बाजू नाहीत. कैलास परिक्रमा करताना या चारी बाजूनी कैलास वेगळा दिसतो. आणखी एका मान्यतेनुसार जेथे कालचक्र लपलेले आहे त्या शम्बाला नगरीचे हे प्रवेशद्वार आहे. या स्वर्गीय नगरीचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे पण आजपर्यत त्याचे रहस्य उलगडलेले नाही. या नगरीत मृत्यू नाही आणि हजारो वर्षे वय असेलेले अनेक महात्मे येथे राहतात असा समज आहे.

Leave a Comment