बद्रिनाथ पूजेत अंबानी कुटुंबाचेच चंदन आणि केशर


देशातील बडे उद्योजक आणि आशियातील सर्वाधिक श्रीमंत मुकेश अंबानी यांनी शनिवारी उत्तराखंड मधील बद्रीनाथ आणि त्यानंतर केदारनाथ दर्शन करून भाग्वानाच्या पूजेमध्ये वापरले जाणारे चंदन आणि केशर यांच्या खर्चासाठी २ कोटी रुपये देणगी दिली आहे. विशेष म्हणजे आता बद्री केदार साठी लागणारे चंदन अंबानी कुटुंबाचेच असेल असे समजते कारण मुकेश अंबानी यांनी शनिवारी बद्रिकेदार मंदिर समिती बोर्ड अधिकाऱ्यांना बद्रीनाथ पूजेसाठी चंदनाची कमतरता भासू नये म्हणून कर्नाटक राज्यात चंदन जंगलात जमीन खरेदी करून तेथे चंदन लागवड करण्यात येईल असे सांगितले. धीरूभाई अंबानी या नावाने हे चंदन जंगल खरेदी केली जाणार आहे.

रिलायंसचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांचा परिवार बद्रिनाथाचे परमभक्त असून दरवर्षी मुकेश बद्री केदार दर्शन घेतात. यंदाही त्यांनी शनिवारी बद्रिनाथाचे दर्शन घेऊन त्यानंतर पूजा केली आणि नंतर गीता पठणात सामील झाले. यावेळी त्यांनी बद्री आणि केदार पूजेसाठी चंदन आणि केशर खरेदीसाठी २ कोटी रुपये दान दिले. यापूर्वी गतवर्षी २४ मे २०१८ मध्ये त्यांनी मुलगा आकाश आणि सून श्लोका त्याच्यासमवेत बद्री दर्शन केले होते. तेव्हाही त्यांनी चंदन आणि केशर खरेदीसाठी २ कोटी १० लाख रुपये दिले होते. मुकेश यांचा धाकटा मुलगा अनंत बद्री केदार मंदिर समितीचा सदस्य आहे.


अंबानी कुटुंबियांची बद्रीनाथ आणि केदारनाथावर परम श्रद्धा आहे. आकाश यांच्या लग्नाची पत्रिका बद्रीनाथाना देण्यासाठी नोवेंबर २०१८ मध्येही मुकेश येथे आले होते. मुकेश यांनी बद्रीनाथाचे दर्शन घेतल्यावर ते देशाच्या कल्याणासाठी भगवानाची प्रार्थना करतात असे सांगितले. यावेळीही त्यांनी अशीच प्रार्थना केली.

शनिवारी मुकेश बद्रीनाथाला पोहोचले तेव्हा बद्रीकेदार माद्नीर समिती प्रमुख अधिकारी बी डी.सिंग धर्माधिकारी भुवनचंद्र उनियाल यांनी त्यांचे स्वागत केले. १० मे रोजी हिवाळ्यानंतर बद्रीनाथ मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले आहे.

Leave a Comment