पर्यटकांच्या अनुसार हे आहेत भारतातील लोकप्रिय ‘बीच डेस्टिनेशन्स’


गोव्यापासून, ओडिशा, गोकर्ण इथपर्यंत, भारताला सुंदर सागरी किनाऱ्यांचे अफाट वैभव लाभलेले आहे. या सुंदर सागरी किनाऱ्यांवर आता पर्यटनाच्या उद्देशाने अनेक आकर्षक बीच रिसोर्ट्स आ असून, देशी आणि विदेशी पर्यटकांच्या सर्व गरजा लक्षात घेऊन ही रिसोर्ट्स बांधण्यात आली आहेत. त्यामुळेच भारतातील अनेक सागरकिनारे आता लोकप्रिय ‘बीच डेस्टीनेशन्स’ म्हणून नावारूपाला आले आहेत. फ्रेंच वास्तुकला आणि मिश्र खाद्य परंपरा ही खासियत आहे पुदुच्चेरीची. या ठिकाणी पर्यटकांसाठी अनेक लहान-मोठ्या अतिथीगृहांचे पर्याय उपलब्ध आहेत. पण त्यातही ‘ला पॉन्डी’ नामक बीच रिसोर्टला पर्यटकांची विशेष पसंती मिळाली आहे. ओडिशा राज्यातील सुंदर सागरी किनारा खरे तर पर्यटकांसाठी वरदानच, पण काही कारणाने या भागामध्ये अगदी अलीकडच्या काळापर्यंत पर्यटनावर जास्त भर दिला जात नव्हता. आता मात्र ओडिशा राज्य पर्यटनाच्या दृष्टीने लोकप्रिय ठरू लागले असून, येथील गोपालपूर बीच लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आले आहे.

अंदमान निकोबार द्वीपसमूहातील हॅवलॉक आयलंड लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. लोकप्रिय असूनही गर्दी, बोभाटा नसलेला सुंदर सागरी किनारा येथील खासियत आहे. तसेच या ठिकाणी पर्यटकांसाठी कयाकिंग, स्नोर्केलिंग, डायव्हिंग इत्यादी सुविधाही उपलब्ध आहेत. केरळ येथील कोवलम बीच हे देखील लोकप्रिय बीच डेस्टिनेशन आहे. त्याचप्रमाणे येथील कुमाराकोम बीच देखील लोकप्रिय आहे. येथील बॅक वॉटर्समध्ये घेतलेला नावेच्या सफरीचा आनंद काही औरच. गोकर्ण बीच पर्यटकांमध्ये लोकप्रिय असून, येथे इतर आवश्यक सोयींच्या बरोबर आयुर्वेदिक उपचारपद्धती उपलब्ध करून देणारी अनेक रिसोर्ट्स आहेत. गोव्यातील अनेक सुंदर बीच पैकी बेनौलीम सागरकिनारा पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

Leave a Comment