मोदी निवडून आल्याच्या आनंदात पेट्रोलपंप धारकाकडून सीएनजीचे मोफत वाटप


भारतामध्ये अनेक चरणांमध्ये पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले, आणि देशांच्या जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूने विजयाचा कौल दिला. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भरघोस मताधिक्याने निवडून आल्याने संपूर्ण देशामध्ये आनंदाचे वातावरण असतानाच, देशामध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रकारे हा आनंद साजरा होत असलेला पहावयास मिळत आहे. गुजरातमधील राजकोट येथील गोपाल चुडासमा नामक एका पेट्रोलपंप धारकाने मात्र, पंतप्रधान मोदी पुन्हा विजयी झाल्याचा आनंद ग्राहकांना मोफत सीएनजीचे वाटप करून साजरा केल्याचे वृत्त आहे. या पेट्रोलपंपावर आलेल्या बहुतेक सर्व रिक्षाचालकांना सीएनजी भरून घेण्यासाठी पैसे मोजावे लागले नाहीत.

याही वेळी पंतप्रधान मोदी विजयी होत असल्याचे, जाहीर होणाऱ्या निकालांवरून स्पष्ट होऊ लागताच, या पेट्रोल पंप धारकाने सीएनजीचे मोफत वाटप करण्याची घोषणा केली. पाहता पाहता या पेट्रोल पंपावर सीएनजी भरून घेण्यासाठी दोनशेच्या वर रिक्षांची गर्दी झाली. सायंकाळ पर्यंत या पेट्रोल पंपावर मोफत सीएनजी भरून घेण्यासाठी आणखी अनेक रिक्षांची गर्दी दिसून येत असल्याचे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.

Leave a Comment