विचित्र कपड्यांमुळे या मॉडेलची हरवली शुद्ध


रँपवॉक म्हटले की रँपवर चालणाऱ्या प्रत्येक मॉडेल प्रत्येकाचे लक्ष असते. अनेकांना त्यांची पाहिल्यावर आपलीही फिगर अशी असावी असे वाटते. पण तशी फिगर मिळविण्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागतात हे खुप कमी लोकांना माहित आहे. त्यातच ह्या मॉडेल्स डाएटिंग, वर्कआउटशिवाय मॉडेल कधी कधी त्यांच्या विचित्र कपड्यांमुळेही बेशुद्ध होतात. असेच काहीसे नुकतेच मॉडेल एली फॅनिंगसोबत घडले आहे.

ही घटना सोमवारी २३ मे रोजी कान महोत्सवात घडली. गरजेपेक्षा जास्त टाइट ड्रेस एका मॉडेलने घातला होता. ती यामुळे चक्क बेशुद्ध पडली. आपल्या इंस्टाग्रामवर एलीने घडलेली घडना सांगितली. एली म्हणाली की, 1950 Prada Prom ड्रेस घालून आज मी बेशुद्ध झाले. पण आता सगळे ठीक आहे. तिने या पोस्टसह #DressTooTight आणि #TimeOfTheMonth असे हॅशटॅग दिले. तिला त्या काळात पाळी आली होती.

जमीलाने एलीच्या या पोस्टवर फॅशन इंडस्ट्रीवर फार कठोर कमेंट केली. ट्विटरवर तिने लिहिले की, टाइट ड्रेसमुळे देवा, सडपातळ अभिनेत्री एली फॅनिंगची शुद्ध हरपली. शुद्ध हरपण्याचे कारण तिने पाळी असल्याचे सांगितले पण सँपल साइजचा ड्रेस ही फार वैताग आणणारी गोष्ट आहे. पाळीच्या काळात वाढलेल्या वजनाला दोष देणे चुकीचे आहे. त्याउलट टाइट ड्रेस घालायला देण्यावर आक्षेप घेतला पाहिजे.

Leave a Comment