
बॉलीवूडची बॉबी गर्ल डिम्पल आता हॉलीवूडच्या चित्रपटात झळकणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिस्टोफर नोलान करणार आहेत. चित्रपटाचे नाव टेनेट असे असून तो पुढील वर्षाच्या १७ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे, बॉबी मधून बॉलीवूड मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी आलेल्या डिम्पलने वयाची साठी नुकतीच पूर्ण केली आहे.
डिम्पल हॉलीवूड चित्रपटात झळकणार
टेनेटचे चित्रीकरण ७ देशात केले जाणार आहे. अर्थात इंग्रजी चित्रपटात काम करण्याची डिम्पलची ही पहिली वेळ नाही. तिने यापूर्वी २००२ मध्ये लीला या अमेरिकन चित्रपटात भूमिका केली होती. टेनेट मध्ये तिच्याबरोबर रोबर्ट पेंटीकन व मायकेल केन याच्याही भूमिका आहेत.

डिम्पलच्या नव्या इनिंग बद्दल लेक आणि अभिनेत्री ट्विंकलने आईला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. ती म्हणते, तुला खूप शुभेच्छा. तुझा खूप अभिमान वाटतो. तू अमेझिंग आहेस आणि आमच्यासाठी आदर्श सुद्धा. योग्यता आणि टॅलंट असेल तर वय अडथळा असू शकत नाही हे तू दाखवून दिले आहेस. अभिनंदन. ट्विंकल सोबत डिम्पलच्या भाच्याने तिचे अभिनंदन करताना तू चांगली अभिनेत्री आहेसच पण माणूस म्हणून तू अधिक चांगली आहेस. गेली ४५ वर्षे तुझी जादू कायम आहे अश्या भावना व्यक्त केल्या आहेत.
