म्हणून क्रिकेटमध्ये चीन मागे


चीन देशाची बहुतेक सर्व क्षेत्रात प्रगती करण्याचा वेग अफाट आहे. तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात चीनने जगात घेतलेली आघाडी तोंडात बोट घालायला लावणारी आहे. चीनला क्रीडा क्षेत्रात खूपच रुची असून ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक वेळी पदके मिळविण्यात चीनी खेळाडू आघाडीवर असतात. मात्र क्रिकेट या खेळत चीन सक्रीय नाही असे दिसते. सध्या क्रिकेट वर्ल्ड कपचा फिव्हर अनेक देशांना व्यापून राहिला असला तर चीन त्यामध्ये नाही. चीनी लोकांना क्रिकेट खेळणेच काय पण पाहणेही विशेष आवडत नाही. त्याची अनेक कारणे सांगितली जातात.

पहिले कारण म्हणजे दर चार वर्षांनी होणार्या जागतिक कीर्तीच्या ऑलिम्पिक स्पर्धा चीनसाठी अधिक महत्वाच्या आहेत. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश नाही त्यामुळे चीनी लोक क्रिकेटला प्राधान्य देत नाहीत. ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक मेडल्स बहुतेक वेळा चीनच्या नावावर असतात. दुसरे कारण असेही सांगितले जाते ज्या ज्या देशात कधी ना कधी ब्रिटीश वसाहती होत्या तेथे क्रिकेट विशेष लोकप्रिय आहे. चीन मध्ये कधीच ब्रिटीश वसाहत नव्हती.


क्रिकेट हा खेळ लोकप्रिय मानला जात असला तर जगातील सर्व देशात तो खेळला जात नाही. उलट काही मोजकेच देश हा खेळ खेळतात. चीन मध्ये सांघिक खेळापेक्षा वैयक्तिक म्हणजे बॅडमिंटन, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक्स अश्या खेळांना अधिक पसंती आहे. आयसीसीने चीन मध्ये क्रिकेटचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले असून चीन मध्ये काही स्थानिक क्रिकेट टीम आहेत, महिला क्रिकेट टीम ही आहे पण अजून तरी त्या कोणत्याची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामन्यात उतरलेल्या नाहीत.

चीनमध्ये म्हणजे तसे क्रिकेट कल्चर रुजत नसल्याचे दिसून येत आहे. एक तर हा खेळ कॉम्प्लीकेटेड आहे आणि सांघिक आहे. अन्य खेळांच्या तुलनेत तो महाग आहे. यामुळेही क्रिकेट लोकप्रिय होण्यात अडचणी येत आहेत. चीनच्या ५० टक्के शाळातून क्रिकेटचे शिक्षण देण्याचा उपक्रम राबविला जात आहे असे समजते.

Leave a Comment