कोणत्याही परिस्थितीत चांगला खेळ करणे महत्त्वाचे – विराट कोहली


नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही यावेळी उपस्थित होते. विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांत खेळताना दबाव पेलणे ही सर्वात महत्त्वपूर्ण बाब असेल, असे विराट कोहलीने पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

विराट म्हणाला, कोणत्याही परिस्थितीत चांगला खेळ करणे महत्त्वाचे असून आमचे सर्व गोलंदाज अगदी ताजेतवाने आहेत. कोणताही क्रिकेटपटू थकलेला नाही. कोणताही गोलंदाज चार षटके टाकल्यानंतर थकलेला दिसत नाही. गोलंदाजांना ५० षटकांच्या सामन्यातही ताजेतवाने ठेवणे आणि चांगली कामगिरी त्यांच्याकडून करून घेणे हे आमचे ध्येय असणार आहे. आमचा संघ हा समतोल असल्यामुळे खेळावर लक्ष केंद्रित करून चांगली कामगिरी करणे हेच यंदाच्या विश्वचषकात आमचे ध्येय आहे.

रवी शास्त्री पुढे म्हणाले, आपण पुन्हा संघाने पूर्ण क्षमतेने खेळ केल्यास विश्वचषक भारतात आणू शकतो. बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ २०१५ च्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी करत आहेत. यावेळची स्पर्धा अधिक आव्हानात्मक असेल. त्यामुळे भारतीय संघाला चांगला खेळ करावा लागेल.

Leave a Comment