सलमानच्या भारतचे अँथम साँग तुमच्या भेटीला


रमजान ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार सलमान खानचा आगामी ‘भारत’ चित्रपट अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना भरभरुन प्रतिसाद दिला आहे. लवकरच रिलीज होणाऱ्या या चित्रपटातील अँथम साँग अर्थात ‘जिंदा’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

‘भारत’ बनलेल्या सलमानचा जीवन प्रवास या गाण्यात दाखवण्यात आला आहे. त्याला भारत पकिस्तान फाळणीचा लहानपणीच कसा फटका बसतो, वडिलांपासून दूर होतो आणि त्यानंतर तो पुन्हा कसा उभारी घेतो हे यात दाखवण्यात आले आहे. विशाल दादलानी यांनी या स्फूर्तीदायक गीताला स्वरसाज चढवला आहे. सलमान शिवाय कतरिना कैफ, सुनिल ग्रोव्हर आणि इतर कलावंत गाण्यामध्ये दिसतात.

दिग्दर्शक अली अब्बास जाफर यांनी चित्रपटाचे अँथम साँग म्हटले जात असलेल्या या गाण्यातून संगीत क्षेत्रात पदार्पण केले आहे. हे गाणे कथा लिहित असताना लिहिल्याचे अब्बास यांनी सांगितले. ‘भारत’चा उद्देश दाखवण्याचा प्रयत्न या गाण्यातून केल्याचे त्यांनी सांगितले. सलमानने सोशल मीडियावर हे गाणे शेअर करताना म्हटले, सामान्य माणसाची असामान्य गोष्ट पाहण्यासाठी ‘जिंदा’ गाणे रिलीज झाले आहे.

Leave a Comment