लवकरच बाजारात येणार ‘रिअलमी’चा 5जी स्मार्टफोन


मुंबई : सध्या तरुण वर्गामध्ये रिअलमी या चीनी कंपनीच्या स्मार्टफोनची क्रेझ वाढत आहे. नुकतेच शाआमीने लाँच केलेल्या रेडीमी नोट 7 प्रो आणि रेडीमी नोट 7 या दोन स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी रिअलमी 3 हा स्मार्टफोन बाजारात लाँच केला होता आहे. रिअलमी तर्फे त्यानंतर आता 5 जी स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. कंपनीने यंदाच्या वर्षाअखेरपर्यंत बाजारात 5 जी फोन आणण्याची तयारी केली आहे.

याबाबत रिअलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने यंदाच्या वर्षाअखेरपर्यंत बाजारात 5 जी फोन आणण्याची तयारी केली आहे. स्नॅपड्रॅगन फ्लॅगशिप प्रोसेसर या 5 जी स्मार्टफोनमध्ये असणार आहे. हा प्रोसेसर असल्याने 5 जी मोबाइल कंपनीचा फ्लॅगशिप मोबाइल ठरु शकतो. 5 जी नेटवर्क भारतात लाँच होण्याआधी रिअलमी भारतात स्मार्टफोन लाँच करेल, असा विश्वास रिअलमी कंपनीने व्यक्त केला आहे.

मार्च 2019 मधील ऑनलाईन मार्केटद्वारे विकणाऱ्या स्मार्टफोनची आकडेवारी काऊंटर पॉईंट या रिसर्च बेस्ड कंपनीने जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार मार्च 2019 मध्ये रिअलमी 3 या स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री झाली आहे. सध्या ऑनलाइन मोबाइल विक्रीमध्ये रिअलमी कंपनीच्या मोबाईलला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे लवकरच कंपनी आता ऑफलाइन विक्रीवर लक्ष केंद्रीत करणार आहे.

रिअलमी कंपनीने गेल्या आठवड्यात रिअलमी X हा फॅल्गशिप स्मार्टफोन लाँच केला. 6.5 इंचाचा एचडी डिस्प्ले आणि octa-core Snapdragon 710 प्रोसेसर यात आहे. या फोनमध्ये Anroid 9 pie हे Ios आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 3700 mAh इतकी आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि पॉप अप सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. या फोनमध्ये 48 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे देण्यात आलेत. या फोनची भारतात 20 हजारपर्यंत किंमत असण्याची शक्यता आहे. हा फोन अद्याप भारतात लाँच करण्यात आलेला नाही.

Leave a Comment