भयाण जगाचे वास्तव दाखवणाऱ्या हुमा कुरेशीच्या ‘लीला’चा ट्रेलर रिलीज


आपल्या पहिल्या-वहिल्या वेबसिरीजसाठी अभिनेत्री हुमा कुरेशी सज्ज झाली असून ती ‘लीला’ या वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. नुकताच थ्रिलरने परिपूर्ण असलेल्या या वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

भयाण जगाचे वास्तव ‘लीला’ या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात येणार आहे. ही वेबसिरीज ६ भागांमध्ये स्ट्रीम केली जाणार आहे. प्रयाग अकबरच्या ‘लीला’ पुस्तकावर आधारित या वेबसिरीजची कथा आहे.

या ट्रेलरमध्ये हुमा कुरेशीचा दमदार अभिनय पाहायला मिळतो. यामध्ये ‘शालिनी’ नावाचे पात्र ती साकारत आहे. ‘शालिनी’च्या आयुष्यात अचानक आलेल्या संकटांना ती कशाप्रकारे सामोरे जाते, याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. दीपा मेहता, शंकर रमन आणि पवन कुमार यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. हुमा या सिरीजच्या माध्यमातून डिजीटल विश्वात पदार्पण करत आहे.

Leave a Comment