भारतीय खेळाडूंना क्षेत्ररक्षणाचे धडे देणार विजय यादव


मुंबई – हरियाणा रणजी संघाचे प्रशिक्षक विजय यादव यांच्यावर एक मोठी जबाबदारी भारतीय क्रिकेट बोर्डाने दिली आहे. भारत ‘अ’ संघास विजय यादव हे क्षेत्ररक्षणाचे धडे देणार आहे. भारत ‘अ’ संघाच्या प्रशिक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विजय यादव यांच्या नियुक्तीची घोषणा बीसीसीआयने नुकतीच केली.

श्रीलंका ‘अ’ संघासोबत होणाऱ्या ५ एकदिवसीय आणि तीन ४ दिवसीय कसोटी सामन्यांत विजय यादव भारतीय ‘अ’ संघाला मार्गदर्शन करतील. विजय यादव माजी भारतीय क्रिकेटर आहेत. यष्टीरक्षक म्हणून त्यांना झिम्बाब्वे विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती.

१९ एकदिवसीय सामन्यात विजय यादव यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. ते सध्या हरियाणा संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Leave a Comment