नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहणारच – साध्वी प्रज्ञासिंह


नवी दिल्ली – भाजपच्या भोपाळ मतदारसंघातील उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे हे देशभक्त होत, आहेत आणि राहणारच असे असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

नथुराम गोडसे याला पहिला हिंदु दहशतवादी असल्याचे कमल हसन यांनी म्हटले होते. याबाबतचा यानंतर वाद वाढत जात असतानाच नथुराम गोडसे याला प्रज्ञासिंह ठाकूर यांनी देशभक्त म्हटले आहे. नथुराम गोडसे यांना जे लोक दहशतवादी म्हणतात त्यांनी एकदा आत्मपरिक्षण करायला हवे. या निवडणुकीत अशा लोकांना उत्तर मिळेल, असेही ठाकूर म्हणाल्या.

नथुराम गोडसेबद्दल अभिनेता कमल हसन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सर्वच स्तरांतून हसन यांच्यावर टीकेची झोड उठली होती. हा विषय तेव्हापासून चर्चेत आहे. स्वातंत्र्योत्तर भारतातील महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता, असे वक्तव्य हसन यांनी केले होते.

त्यांच्या या वक्तव्याचा मराठी कलाकारांनीही निषेध केला आहे. कमल हसन यांच्यावर अभिनेते शरद पोक्षेंनीही निशाणा साधला होता. हिंदू सहिष्णूवादी आहेत म्हणूनच असले वक्तव्य खपवून घेतले जात असल्याचे पोंक्षेंनी म्हटले होते. दहशतवादाला धर्म नसतो, अगदीच मान्य पण, पकडलेला दहशतवादी हा मुस्लीम असतो, हे जगातील वास्तव आहे. हिंदू धर्म हा मुळातच सहिष्णू आहे. इतिहास साक्ष आहे, की हिंदूंनी कधीही दहशतवादी कारवाया केल्या नाहीत. आक्रमणे केली नाहीत, असेही ते म्हणाले.

Leave a Comment