पेटीएमने लाँच केले क्रेडिट कार्ड


मुंबई : डिजिटल व्यवहारातील अग्रगण्य कंपनी असलेल्या पेटीएमने आता क्रेडिट कार्ड लाँच केले असून पेटीएमने हे कार्ड सिटी बँकसोबत लाँच केले आहे आणि ‘पेटीएम फर्स्ट कार्ड’ नाव याला दिले आहे. कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक टक्के कॅशबॅक अनलिमिटेड ऑफरही दिली आहे.

ग्राहकांना पेटीएम फर्स्ट कार्डसाठी वर्षाला 500 रुपये भरावे लागणार. पण तुम्ही जर 50 हजारपेक्षा अधिक खर्च केले, तर ही फी तुमच्यासाठी माफ केली जाईल. प्रत्येक महिन्याला कार्डची मर्यादा एक लाख रुपये असेल. यामुळे अनेकांना शॉपिंगसाठी याचा फायदा होईल.

ग्राहकांना प्रत्येक व्यवहारावर एक टक्के कॅशबॅक ऑफर मिळेल. ही ऑफर प्रत्येक महिन्याला ग्राहकांच्या खात्यात ऑटोमेटिक जमा होईल. पेटीएमने सप्टेंबर 2017 मध्ये डेबिट कार्ड लाँच केले होते. पेटीएम अॅपवरुन तुम्ही फर्स्ट गार्डसाठी अप्लाय करु शकता, असे कंपनी म्हणाली. सध्याच्या डिजिटल युगात मोठ्या प्रमाणात लोक डिजिटल व्यवहार करतात. यामध्ये सर्वाधिक क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. याच पार्श्वभूमिवर कंपनीने क्रेडिट कार्ड लाँच केल्याची चर्चा सुरु आहे.

Leave a Comment