शूजितच्या आगामी चित्रपटात बिग बींसोबत स्क्रिनशेअर करणार आयुष्मान


आपल्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये बॉलीवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले असल्यामुळे प्रत्येक कलाकाराला त्यांच्यासोबत काम करावे असे वाटत आहे. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी त्यांच्यासोबत आतापर्यंत काम केले आहे. तर बिग बींसोबत स्क्रीन शेअर करायची काही कलाकारांना इच्छा आहे. अभिनेता आयुष्मान खुराणा देखील त्यातील एक कलाकार आहे. लवकरच आयुष्मानची ही इच्छा पूर्ण होणार असून शूजित सरकारच्या आगामी चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि आयुष्मान लवकरच एकत्र झळकणार आहेत.

आतापर्यंत ‘पीकू’, ‘मद्रास कॅफे’ आणि ‘विक्की डोनर’ यासारख्या चित्रपटांचे बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक शूजित सरकार यांनी दिग्दर्शन केले असून त्यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ आणि आयुष्मान या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत दिली आहे.


या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरु असून जुही चतुर्वेदी यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला जूनमध्ये सुरुवात होणार आहे. मी आणि जुही या चित्रपटाच्या कथेवर सध्या काम करत आहोत. जेव्हा एखाद्या चित्रपटाची कथा जुही लिहित असते तेव्हा ती कथा कायम हटके असते. तिचा एक वेगळा स्वतंत्र असा ट्रेडमार्क असतो. तिने लिहिलेली कथा मी वाचली असून ही कथा वाचल्यानंतर लगेच अमिताभ बच्चन आणि आयुष्मान यांना सांगितल्याचे शूजित यांनी म्हटले आहे.

Leave a Comment