जॅक मा यांचे कर्मचाऱ्यांसाठी 669 सूत्र


नेहमीच आपल्या धोरणांमुळे अलिबाबाचे संस्थापक जॅक मा चर्चेत असतात. त्यांनी याआधी लोकांना 996 फॉर्म्यूला सांगत त्याची अंमलबजावणी करण्याचा सल्ला दिला होता. आठवडाभर सकाळी ९ वाजण्यापासून त रात्री ९ वाजेपर्यंत सलग काम करणे असा 996 चा अर्थ होतो. पण जॅक मा यांनी आता सेक्ससंबंधी सल्ला दिला आहे. त्यांनी यासाठी 669 चे सूत्र सांगितले आहे. सहा दिवस, सहा वेळा सेक्स करणे असा याचा अर्थ होतो.

यासंदर्भातील वृत्त डेली मेलने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यादरम्यान चीनमधील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवणारे जॅक मा यांनी हे सूत्र सांगितले. जॅक मा यांनी सांगितले की, मी काम करताना 996 वर जोर देतो, पण खासगी आयुष्यात 669 ची अंमलबजावणी केली पाहिजे.

दरवर्षी आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी ५४ वर्षीय जॅक मा सामूहिक विवाहसोहळ्याचे आयोजन करतात. हा कार्यक्रम १० मे रोजी पार पडतो. जॅक मा यांच्या 996 फॉर्म्युलावर तंत्रज्ञान क्षेत्रात प्रचंड टीका करण्यात आली होती. त्यातच त्यांच्या आता 669 फॉर्म्युलावरुनही सोशल मीडियावर गोंधळ निर्माण झाला आहे. त्यांची खिल्ली उडवत एका युजरने म्हटले आहे की, जगात कोणाकडे 669 केल्यानंतर 996 साठी एनर्जी उरणार आहे. 669 सुत्र एका इमोजीसोबत अलिबाबाच्या अधिकृत पेज वाइबोवर पोस्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment