आयसीसीच्या पहिल्या महिला मॅच रेफरीपदी भारताच्या जी. एस. लक्ष्मी


दुबई – आयसीसीच्या पहिल्या महिला मॅच रेफरी म्हणून भारताच्या जी. एस. लक्ष्मी यांची निवड करण्यात आली आहे. स्थानिक महिला क्रिकेटमध्ये ५१ वर्षीय लक्ष्मी या २००८-०९ साली मॅच रेफरी पदावर राहिल्या आहेत. त्यांनी याचसोबत तीन टी-२० आणि एकदिवसीय सामन्यात मॅच रेफरी म्हणून काम पहिले आहे. याच महिन्यात क्लेयर पोलोसक यांनी पुरूषाच्या क्रिकेट स्पर्धेत पंच म्हणून लक्ष्मी यांच्या पूर्वी भूमिका बजावली होती.

त्या या निवडीबाबत बोलताना म्हणाल्या, आयसीसीकडून निवडण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये निवड होणे, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. माझे भारतात एक क्रिकेटर आणि मॅच रेफरी म्हणून करिअर मोठे राहिले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना माझ्या अनुभवाचा उपयोग होईल. माझे ज्यांनी सर्मथन केले त्या सर्वांसह आयसीसी, बीसीसीआयचे अधिकारी आणि खेळाडूंचे मी आभार मानते.

याबाबत आयसीसीचे पंच आणि रेफरीचे वरिष्ठ व्यवस्थापक एड्रियन ग्रिफिथ म्हणाले, लक्ष्मी आणि एलॉस यांचे पॅनलमध्ये आम्ही स्वागत करतो. ही निवड महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी योग्य आहे. त्या इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरतील. त्यांच्या पुढच्या करिअरसाठी मी शुभेच्छा देतो.

Leave a Comment