राखी सावंत मानाच्या पुरस्काराने सन्मानित


नुकतीच पाकिस्तानाचा झेंडा घेऊन काढलेल्या फोटोमुळे टीकेची धनी बनलेली बॉलीवूडची ड्राम क्वीन अर्थात राखी सावंत आता फारच वेगळ्या आणि हटके गोष्टीमुळे चर्चेत आहे. एका मानाच्या पुरस्काराने राखी सावंतला सन्मानित करण्यात आले आहे. राखी सावंतला ‘दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट आयटम डान्सर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार राखीला शनिवारी मिळाला. हा पुरस्कार दादासाहेब फाळके फाउंडेशनकडून देण्यात येतो.

आपले करियर वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो, पण त्याचे चीज होण्यासाठी पाठीवर कौतुकाची थाप हवी असते. या फाउंडेशनने हीच गोष्ट केली आहे. गेल्या 12 वर्षांत विविध भाषांत मिळून जवळजवळ 100 आयटम गाण्यांवर राखीने डान्स केला आहे, पण तिला आजपर्यंत कोणताही पुरस्कार मिळाला नाही. म्हणूनच राखीला यावर्षी सर्वोत्कृष्ट आयटम डान्सर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पण या बातमीवर अजूनही तिच्या चाहत्यांना विश्वास बसत नाही. तर तिने हा पुरस्कार विकत तर घेतला नाही ना? अशी विचारणाही काहींनी केली. पण यावर, एवढा मोठा पुरस्कार विकत घेण्याची माझी कुठली औकात, असे राखीने उत्तर दिले. नुकत्याच आपल्या भोजपुरी आयटम नंबर नंतर, राखी मनमोहिनी या मालिकेत दिसून आली होती. त्यानंतर आता ती बॉक्स क्रिकेट लीग – सीझन 4 चे निवेदन करणार आहे.

Leave a Comment