राजस्थानात स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन पुन्हा राजकारण


जयपूर – दहावीच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील धड्यामध्ये बदल करण्याचा निर्णय राजस्थान सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला असून विनायक दामोदर सावकर यांचा स्वातंत्र्यवीर आणि महान देशभक्त असा उल्लेख तीन वर्षापूर्वी भाजप सरकारच्या काळात करण्यात आला होता. पण शालेय अभ्यासक्रमात वीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती असा उल्लेख नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेस सरकारकडून करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी राजस्थान सरकारने एक समिती गठित केली होती. पाठ्यक्रमात बदल या समितीच्या शिफारशींवरुन करण्यात आल्याचा दावा राजस्थानमधील शिक्षण मंत्री गोविंद सिंह दोतासरा यांनी केला आहे. दोतासरा यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यतिरिक्त अन्य स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांच्या योगदानाला मागील सरकारच्या काळात महत्त्व दिले गेले नाही. पण भाजपने पाठ्यपुस्तकात केलेल्या बदलावर आक्षेप घेतला आहे. वीर सावरकरांच्या धड्यात बदल करणे म्हणजे वीर सावरकरांचा अपमान असल्याची टीका भाजपने काँग्रेस सरकरावर केली आहे.

भाजप सरकारच्या काळात सावरकरांच्या धड्याची सुरुवात वीर सावरकर एक महान क्रांतिकारी, देशभक्त आणि संघटनवादी नेते होते. त्यांनी आजीवन देशाच्या स्वातंत्र्यासाठी तप आणि त्याग केला. त्यांचे कौतुक शब्दांमध्ये करता येणार नाही. सावरकरांनी देशातील जनतेने स्वातंत्र्यवीर उपाधी दिली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली होती असे भाजपच्या काळातील अभ्यासक्रमात नमुद करण्यात आले होते.

Leave a Comment