‘स्टूडंट ऑफ द ईअर २’ने पहिल्या दिवशी केली एवढी कमाई


शुक्रवारी पुनित मल्होत्राद्वारा दिग्दर्शित ‘स्टूडंट ऑफ द ईअर २’ चित्रपट प्रदर्शित झाला. अभिनेत्री अनन्या पांडे आणि तारा सुतारियाने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तर प्रेक्षकांनी या बॉलिवूडच्या नव्या स्टूडंटचे स्वागत करत चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला आहे.

बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चित्रपटाने १२.६ कोटींची कमाई केली आहे. तर आज आणि उद्या कमाईत वाढ होण्याची शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी वर्तवली आहे. दरम्यान अभिनेता टायगर श्रॉफ या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

टायगरचा पहिल्याच दिवशी इतकी कमाई करणार हा दुसरा चित्रपट ठरला आहे. याआधी २०१८ मध्ये आलेल्या त्याच्या ‘बागी २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी २५.१० कोटींची कमाई केली होती. आता टायगरचा हा चित्रपट १०० कोटींचा गल्ला पार करण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment