जॉन्सन अँँड जॉन्सन कंपनीच्या बेबी शँँपूवर अनेक ठिकाणी बंदी


सुप्रसिद्ध कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन खास लहान मुलांकरिता अनेक प्रोडक्ट्स तयार करीत असते. यामध्ये ही कंपनी बनवीत असलेली बेबी पावडर, बेबी सोप, बेबी शँपू इत्यादी खास लहान मुलांच्या करिता तयार करण्यात येणारी प्रोडक्ट्स लोकप्रिय आहेत. पण गेल्या काही काळापासून ही कंपनी बनवीत असलेल्या बेबी शँपूमध्ये फॉर्मलडीहाईड आणि तत्सम अनेक अपायकारक रसायनांचा वापर केला जात असल्याचे म्हटले जात असल्यामुळे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी तयार करीत असलेल्या बेबी शँपूवर भारतामध्ये अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी खाद्य सुरक्षा व औषधी नियंत्रण विभागाच्या वतीने घालण्यात येत असून, विभागाच्या वतीने अनेक ठिकाणी छापे घालून बेबी शँपूचे अनेक नमुने चाचण्यांसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. अलीकडच्या काळामध्ये एफएसडीएच्या अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये असलेल्या सेन्ट्रल स्टोरवर छापा टाकून कंपनीची काही प्रोडक्ट्स ताब्यात घेतली आहेत.

या पूर्वी जयपूर या ठिकाणी छापे घालून जप्त केलेल्या बेबी शँपूमध्ये फॉर्मलडीहाईड सारखे घातक रसायन सापडले होते. हे रसायन अतिशय घातक असून, याच्या संपर्कामुळे त्वचा रोग आणि श्वसनरोग उद्भविण्याची शक्यता असते. त्याचबरोबर हे रसायन कर्करोगालाही कारणीभूत ठरू शकते. हे रसायन इतके घातक असल्याने खाद्य सामग्री आणि औषधांमध्ये या रसायनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. प्रसाधानांमध्ये या रसायनाचा वापर केल्याने त्वचेची रंध्रे बंद होत असून, त्यामुळे शरीरातील कोशिका प्रभावित होत असल्याने त्वचेच्या आरोग्याच्या दृष्टीने हे रसायन अपायकारक आहे.

Leave a Comment