राहुलशी साधर्म्याने कंटाळला आणि बदलून टाकला लुक


सुरत शहरात रस्त्याकडेच्या टपरीवर चमचमीत पदार्थ विकणारा प्रशांत सेठी तो अगदी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासारखा दिसतो हे ऐकून इतका कंटाळला आहे कि अखेरी त्याने त्याचा लुक बदलून टाकला आहे. राहुल बरोबर त्यांची सतत तुलना होत असल्याने आणि केवळ राहुल सारखा दिसतो म्हणून मैत्री करण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याने प्रशांत चिडला आणि त्याने त्याचा क्लीन शेव, छोटे केस हा गोंडस लुक सोडून रफ अँड टफ लुक स्वीकारला आहे. यासाठी त्याने २० किलो वजन वाढविले आहेच शिवाय दाढी वाढविली आहे आणि हेअरस्टाईलपण बदलली आहे. २४ वर्षीय प्रशांतची पत्नी गुंजनला आपला नावर राहुल सारखा दिसतो याचा अभिमान आहे. ती म्हणते, राहुल गांधी देशातील सध्या मोस्ट इलीजीबल बॅचलर आहेत आणि माझा नवरा त्यांचासारखा दिसतो याचा मला अभिमान आहे.


प्रशांतसुद्धा राहुल यांचा फॉलोअर होता आणि दोन वर्षापूर्वी त्याने युथ कॉंग्रेसची निवडणूक लढविली होती. तो कॉंग्रेसचा सदस्य होता पण त्याच्या लक्षात आले त्याला राजकारण आवडत नाही. तो चांगला कुक आहे आणि उत्तम प्रकारचे फ्राईड चिकन बनवितो आणि तोच त्याचा व्यवसाय आहे तेव्हा त्याने राजकारण सोडून व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. राहुल गांधी यांनी एकदा त्याच्या टपरीवर यावे आणि येथील पदार्थ चाखावेत असे त्याला वाटते. राहुल यांना कॉंग्रेस अध्यक्षपद मिळाल्यावर त्याने पार्टी दिली होती. पण सतत राहुल यांच्या दिसण्याशी साम्य असल्याने होत असलेल्या चर्चेमुळे त्याची चिडचिड होत आहे.


प्रशांत सांगतो २०१४ च्या निवडणूक काळात राहुल गांधी आणि माझ्यात असलेले विलक्षण साम्य पाहून मी चर्चेत आलो. माझे फीचर्स राहुल गांधी यांच्यासारखे आहेतच पण मलाही गालावर खळी पडते. त्यामुळे माझ्या छोट्या टपरीवर ग्राहक वाढले, पण बहुतेक मी राहुल सारखा दिसतो म्हणून सेल्फीसाठी येत असत. गेल्या पाच वर्षात खूप बदलले आहे. प्रशांत आता बीजेपीचा समर्थक आहे. तो म्हणतो, राष्ट्रीय नेता म्हणून राहुल गांधी यांच्याबद्दल मला आदर आहे पण पंतप्रधान म्हणून माझी पसंती मोदी यांना आहे. मोदी याच्यावर बनत असलेल्या बयोपिक मध्ये राहुलच्या भूमिकेसाठी मला विचारणा झाली पण मी नकार दिला. माझी तुलना राहुल सोबत होऊ नये असे मला फार वाटते आहे. प्रशांत याचे कुटुंब मुळचे पंजाब मधले असून ते सुरत येथे स्थायिक झाले आहेत.

Leave a Comment