‘स्त्री’ सिक्वेलमध्ये देखील झळकणार राजकुमार-श्रद्धा


मागच्या वर्षी राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवले होते. १०० कोटींच्या पुढे अल्प बजेट असलेल्या या चित्रपटाच्या कमाईचे आकडे गेले होते. हा चित्रपट राजकुमार रावच्या करिअरमधील सर्वाधिक कमाईचा ठरला होता. या चित्रपटाचा सिक्वेलही आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रेक्षकांना हॉरर कॉमेडी असलेला ‘स्त्री’ चित्रपट फारच भावला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले होते. तर, निर्मिती दिनेश विजान यांनी केली होती. पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकारही या चित्रपटात झळकले होते.

यासंदर्भात एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, हेच कलाकार ‘स्त्री’ च्या सिक्वेलमध्येही झळकणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटाच्या सिक्वेलच्या कथेवर सध्या काम सुरू आहे. ‘स्त्री’च्या सिक्वेलसाठी नवीन कल्पनांची आखणी करण्यात येणार आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर सिक्वेलसाठी प्रेक्षकांच्या अपेक्षा जास्त आहेत. या चित्रपटाच्या सिक्वेलमधून प्रेक्षकांचे पुरेपुर मनोरंजन व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, निर्मात्यांनी सांगितले आहे.

जिथे ‘स्त्री’ चित्रपट संपतो, सिक्वेलची सुरुवात तिथुनच होणार आहे. या सिक्वेलचे बरेचसे भाग लिहून झाले आहेत. अनेक घटनांचा संदर्भ दुसऱ्या भागात दाखवला जाणार असल्यामुळे ‘स्त्री’चा सिक्वेलही प्रेक्षकांना नक्की आवडेल, असे दिनेश विजान यांनी म्हटले आहे.

Leave a Comment