चालत्या बाईकवर जोडप्याचे अश्लील चाळे, व्हिडीओ व्हायरल


नवी दिल्ली :सध्या सोशल मीडियावर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ व्हायरल होणे मागे कारण देखील तसेच आहे. या व्हिडीओवर नेटीझन्स आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ एका आयपीएस अधिकाऱ्याने शेअर केला आहे. शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक जोडपे धावत्या बाईकवर अश्लील चाळे करताना दिसत आहेत. आयपीएस अधिकाऱ्याने आपल्या ट्विटर अकांऊंटवरून प्रेमी युगुलांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. बाईकवरील जोडी या व्हिडीओमध्ये किस करताना दिसत आहे.


दरम्यान, आयपीएस अधिकाऱ्याचे हा व्हिडीओ राजोरी गार्डन परिसरातील असल्याचे म्हणणे आहे. एक कपल बाईकवरून प्रवास करत आहे. त्यावेळी मुलगी बाईकच्या टाकीवर बसून मुलाला मिठी मारत आहे. शिवाय, किसदेखील करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. आता अनेकांनी या व्हिडीओनंतर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

आयपीएस अधिकाऱ्याने ट्विट केल्यानंतर मोटार वाहन कायद्यामध्ये एका नव्या कलमाची गरज असल्याचे म्हटले आहे. आयपीएस अधिकाऱ्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो प्रचंड प्रमाणात व्हायरल देखील झाला. गाडीचा नंबर किंवा मुलीचा चेहरा या व्हिडीओमध्ये दिसत नाही आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर वाहनांची गर्दी असल्याचे देखील दिसून येत आहे. या व्हिडीओबाबत पोलिसांनी तपास देखील सुरू केला आहे.

Leave a Comment