दीपिका, सारा अली खान, प्रियांका ठरल्या ‘इन्स्टाग्रामर्स ऑफ द इयर’


बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास, दीपिका पदुकोन आणि सारा अली खान या २०१९ सालच्या ‘इन्स्टाग्रामर्स ऑफ द इयर’ ठरल्या असून, दर वर्षी इन्स्टाग्रामवर सर्वात प्रभावी ठरलेल्या व्यक्तिमत्वांना हा खिताब देण्यात येत असतो. अनेक छायाचित्रे, स्टोरीज, लाइव्ह फीड्स, स्टिकर्स, पोस्ट्स, इतरांच्या पोस्ट्सवर दिल्या गेलेल्या प्रतिक्रिया या द्वारे जास्तीत जास्त इन्स्टाग्राम युजर्सपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकणाऱ्या इन्स्टाग्राम युजर्सना हा खिताब देण्यात येत असतो.

३९ मिलियन फॉलोअर्स, आंतरराष्ट्रीय फॅन बेस असणाऱ्या, आणि बॉलीवूडसोबत हॉलीवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रियांका चोप्राचा इन्स्टाग्राम अकाऊंट, जगातील ‘मोस्ट फॉलोड’ इन्स्टाग्राम अकाऊंट ठरला आहे, तर भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचा इन्स्टाग्राम अकाऊन्ट हा लोकांना सर्वाधिक आकृष्ट करून घेणारा, म्हणजेच ‘मोस्ट एन्गेजिंग’ अकाऊंट ठरला आहे. विराट त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याचे लॉकर रूममधील अनेक फीड्स, त्याची ट्रेनिंग सेशन्स आणि अनुष्का सोबतची अनेक छायाचित्रे नियमित आपल्या फॉलोअर्ससोबत शेअर करीत असतो.

दीपिका तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक पोस्ट्स, कान चित्रपट महोत्सवाच्या वेळी घेतलेली छायाचित्रे, प्रवासाला निघाल्यानंतर एअरपोर्ट वरील छायाचित्रे, आपले अनुभव, इतर स्टोरीज आपल्या चाहत्यांच्या बरोबर नियमित शेअर करीत असून, तिच्या या पोस्ट्सना इन्स्टाग्राम युजर्स कडून नेहमीच खूप पसंत केले जाते. म्हणूनच दीपिकाला यंदाच्या वर्षीचा ‘स्टोरीटेलर ऑफ द इयर’ या खिताब देण्यात आला आहे. सारा अली खान हिने इन्स्टाग्रामवर आपला अकाऊंट २०१८ साली सुरु केला असून, तिच्या फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. म्हणूनच साराला ‘रायजिंग स्टारऑफ द इयर’ हा खिताब इन्स्टाग्रामने बहाल केला आहे. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आणि आपले अनुभव त्यांच्याशी शेअर करण्यासाठी, चाहत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी इन्स्टाग्रामने एक उत्तम मंच उपलब्ध करून दिला असल्याचे सारा म्हणते.

Leave a Comment