‘दे दे प्यार दे’मधील आणखी एक गाणे रिलीज


अभिनेता अजय देवगनच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ चित्रपटातील नवीन गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. ‘चले आना’ असे बोल असलेले गाणे रिलीज करण्यात आले आहे. बॉक्स ऑफिसवर आपली कामगिरी दाखवण्यासाठी अजयचा हा चित्रपट सज्ज झाला आहे. अजय चित्रपटात ५० वर्षाचा दाखवण्यात आला असून २४ वर्षाच्या मुलीच्या तो प्रेमात पडला आहे. या दोघांमध्ये तब्बल २६ वर्षांचा फरक आहे. अजयसोबतच चित्रपटात तब्बू आणि रकुल प्रित मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

तब्बू चित्रपटात अजयच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रकुल त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. आकिब अली यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर लव रंजन यांनी चित्रपटाच्या कथेचे लेखण केले आहे. ‘दे दे प्यार दे’चित्रपट १७ मेच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Leave a Comment