‘भारत’मधील नवे गाणे तुमच्या भेटीला


बॉलिवूडची मोस्ट लव्हेबल जोडी अर्थात सलमान खान आणि कतरिना कैफ हे लवकरच पडद्यावर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ही जोडी ‘भारत’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटातील नवे गाणे सलमान खानने शेअर केले आहे.

या गाण्याचे ‘चाशनी’ असे शीर्षक असून सलमानने या गाण्याचा मंगळवारी टीझर शेअर करत इश्क मीठा हैं, असे कॅप्शन दिले होते. कतरिना आणि सलमानची खास केमेस्ट्री २ मिनिट ४४ सेकंदांच्या या गाण्यात पाहायला मिळत आहे. अभिजीत श्रीवास्तव यांनी या गाण्याला आवाज दिला आहे तर याचे संगीत दिग्दर्शन विशाल-शेखर यांनी केले आहे.

अली अब्बास जफर यांनी भारत चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटाची निर्मिती अतुल अग्निहोत्री, भूषण कुमार आणि क्रिशन कुमार यांनी केली आहे. सलमान या चित्रपटाच्या निमित्ताने अली अब्बास जफर यांच्यासोबत तिसऱ्यांदा काम करणार आहे. याआधी त्यांनी सुलतान आणि टाईगर जिंदा हैं चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे. दरम्यान ५ जूनला ईदच्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment