मागील तीन वर्षांत राज्यातील विविध जिल्ह्यांत आमिर खानच्या पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून श्रमदान करून पाण्याचा प्रश्न समस्या सोडवण्यात येत आहे. आमिर खान स्वतः यासाठी सामान्यांच्यात जाऊन नागरिकांना या कामासाठी प्रोत्साहीत करण्याकरीता श्रमदान करताना दिसत असतो.
साताऱ्यात आमिर आणि पत्नी किरणचे श्रमदान
आमिरने पत्नी किरणसह नुकतेच साताऱ्यात श्रमदान केले आहे. महाराष्ट्र पाणीटंचाईविरहित करण्यासाठीच्या आमिर आणि किरणच्या प्रयत्नाला गावागावातील नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये आमिर आणि किरणसह गावकरीही श्रमदानासाठी निघालेले दिसत आहेत.
(व्हिडीओ सौजन्य – PeepingMoon Media )
दरम्यान अनेक कलाकारांचाही आमिरच्या या मोहिमेला पाठिंबा मिळत असून या कामाला कलाकारही श्रमदान करत हातभार लावत आहेत. अभिनेत्री सई ताम्हणकरनेही महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे श्रमदान केले आहे.