रिलाज झाला अर्जुनच्या ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’चा ट्रेलर


लवकरच अभिनेता अर्जुन कपूरचा आगामी चित्रपट ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. अर्जुन कपूरची एक वेगळीच भूमिका या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ट्रेलर प्रदर्शित होताचा सोशल मीडिवर तुफान व्हायरल झाला आहे. तसेच प्रेक्षकही याला चांगलाच प्रतिसाद देत आहेत.

अर्जुन त्याच्या पाच मित्रांसह भारतातील मोस्ट वॉन्टेडला पकडण्याची जोखीम यामध्ये हाती घेतो, त्यातच त्याची टीम कोणाचा ही पाठींबा नसताना आणि कोणत्याही हत्याराचा वापर न करता मोस्ट वॉन्टेडला पकडण्याचा सापळा आखतात. अर्जुन या मिशनमध्ये अनेक योजना आखतो. २ मिनीटे ३० सेकंदाचा ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटाचा ट्रेलर आहे. तसेच ट्रेलरमध्ये अर्जुनची एक वेगळीच झलक पाहायला मिळाली आहे.

भारतातील अशा जवानांवर आधारित हा चित्रपट आहे ज्यांचा आता पर्यंत कधीच कुठे उल्लेख केला गेला नाही. राज कुमार गुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर भारत आणि नेपाळमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. हा चित्रपट २४ मे २०१९रोजी रिलीज होणार आहे.

Leave a Comment