तुम्ही पाहिले आहे का ‘कोण होणार करोडपती’चे टायटल ट्रॅक?


सामान्य जनमानसात ‘कौन बनेगा करोडपती’ या शोची प्रचंड क्रेझ आहे. अनेक सर्वसामान्य व्यक्तींना हिंदी वाहिनीवरील या शो’ने करोडपती बनवले आहे. मराठीतही हिच संकल्पना उतरवली गेली. ‘कौन बनेगा करोडपती’ शोचे मराठीतही प्रसारण व्हायला लागले आणि या शोने पाहता पाहता मराठी मनातही आपले घर बनवले. अशाच आशयाचे बोल घेऊन मराठी ‘कौन बनेगा करोडपती’चे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

यावेळी या शोचे नागराज मंजुळे विशेष आकर्षण आहे . एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिल्यानंतर आता या शोच्या माध्यमातुन ते प्रश्न विचारताना दिसणार आहेत. या शोचा प्रोमो काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या शोचे धमाल असे टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आले आहे.

नागराज मंजुळे यांनी या गाण्यातून आयुष्याला कलाटणी देणाऱ्या, तुमची स्वप्न पूर्ण करायला मदतीचा हात देणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची हिच खरी वेळ असल्याचे सांगितले आहे. विजय मौर्या यांनी या टायटल ट्रॅकचे दिग्दर्शन केले आहे. तर ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलं आहे. या गाण्याला आवाजही त्यांनीच दिला आहे. या गाण्यातून नागराज मंजुळेच्याही आवाजाची झलक ऐकायला मिळते.

Leave a Comment