बायकल सरोवर-सायबेरियाची खासियत


जगातील सर्वात मोठे आणि सर्वात जास्त खोली असणारे सरोवर म्हणून सायबेरियामध्ये असलेले बायकल सरोवर ओळखले जाते. याचाच उल्लेख ‘द पर्ल ऑफ सायबेरिया’ असा ही केला जातो. पृथ्वीवर जितकी सरोवरे अस्तित्वात आहेत, त्यांमध्ये या सरोवराचे पाणी सर्वात निर्मळ, निळेशार आहे. निसर्गदत्त सौंदर्य, प्राणी आणि वनस्पती यांच्या इथे आढळणाऱ्या असंख्य प्रजाती आणि स्थानिक ‘बुर्यात’ संस्कृतीने या परिसराला दिली असलेली खास ओळख यामुळे या सरोवराला १९९६ साली युनेस्कोतर्फे ‘वर्ल्ड हेरीटेज साईट’चा दर्जा देण्यात आला आहे. हे सरोवर जगातील सर्वात मोठे आणि सर्वात जास्त खोली असलेले सरोवर असून, याची सर्वाधिक खोली १६४२ मीटर आहे.

हे सरोवर पृथ्वीतलावरील सर्वात प्राचीन सरोवरांपैकी एक असून, याचे निर्माण सुमारे पंचवीस ते तीस मिलियन वर्षांपूर्वी झाले असल्याचे म्हटले जाते. या सरोवराचा आकार अर्धचंद्राकृती असून, सायबेरियाच्या हाडे गोठविणाऱ्या हिवाळ्यामध्ये या सरोवराचे पाणी गोठून अतिशय टणक पृष्ठभाग तयार होतो. हे सरोवर गोठलेल्या स्थितीमध्ये असताना बर्फाच्या मोठ्या खडकांमधून सूर्यप्रकाश पडत असताना त्या प्रकाशाने हे बर्फाचे खडक एखाद्या रत्ना प्रमाणे चमकत असतात. रात्रीच्या वेळी चंद्र प्रकाशामध्ये मात्र या सरोवराचे रूप काहीसे भीतीदायक भासते.

या सरोवराचे पाणी अतिशय निर्मळ आणि स्वच्छ असून, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ज्या ठिकाणचे पाणी गोठले नसेल, त्या ठिकाणी पाण्याच्या खाली तीस ते चाळीस मीटरपर्यंत सरोवराचा तळ स्पष्ट दिसतो. या सरोवराचा किनारा २००० किलोमीटरचा असून, मोगोय नामक बेट या सरोवरातील सर्वात मोठे बेट आहे. या बेटावर जाण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नावेचा उपयोग करण्यात येतो, तर हिवाळ्यामध्ये बर्फ गोठले असल्याने बेटावर पोहोचण्यासाठी स्नो-मोबाईल किंवा डॉग स्लेडचा वापर करण्यात येत असतो. या बेटावर एक सुंदर बौद्ध स्तूप असून, बेटावरील सर्वात उंचावरील जागेवर हा स्तूप बनविण्यात आला आहे.

या सरोवरातील ओल्खोन बेट हे लोकप्रिय पर्यटनस्थळ असून, या बेटावर येणाऱ्या पर्यटकांसाठी काही वस्तूसंग्रहालये, आणि खरेदीची ठिकाणे ही आकर्षणाची केंद्रे आहेत. या बेटावर ‘बुर्यात’ जमातीच्या लोकांचे वास्तव्य सर्वाधिक असून, ही सायबेरियाची स्थानिक जमात आहे. या जमातीच्या दृष्टीने या बेटाला आध्यात्मिक महत्व आहे. म्हणूनच कदाचित या बेटावरील झाडांना किंवा खांबांना रंगेबिरंगी ध्वज बांधण्याची

Leave a Comment