‘दे दे प्यार दे’मधील आणखी एक गाणे तुमच्या भेटीला


लवकरच ‘दे दे प्यार दे’ चित्रपटातून अभिनेता अजय देवगण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजयसोबतच या चित्रपटात तब्बू आणि रकुल प्रीत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटातील आता आणखी एक गाणे रिलीज करण्यात आले आहे.

या गाण्याचे ‘हौली हौली’ असे शीर्षक आहे. अजय, रकुल आणि तब्बू यांचा जबरदस्त डान्स गाण्यात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या गाण्याला गॅरी संधू आणि नेहा कक्करने आवाज दिला आहे. या चित्रपटात पूर्वाश्रमीची पत्नी आणि २४ वर्षांनी लहान गर्लफ्रेंड यांच्यात अडकलेल्या अजयची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन अकिव अली यांनी केले आहे. हा त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. तर चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, क्रिशन कुमार, लव्ह रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे. आता हे नवे गाणे प्रेक्षकांची मने जिंकण्यास यशस्वी ठरते का? हे पाहूया. दरम्यान हा चित्रपट १७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment