‘भारत’मधील पहिले वहिले गाणे रिलीज


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या जोडीचा ‘भारत’ चित्रपट येणार आहे. अगदी सुरुवातीपासुनच हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिशा पटाणी आणि सलमान खानचा डान्स असलेले ‘स्लो मोशन’ या गाण्याची या ट्रेलरमध्ये झलक पाहायला मिळाली. हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचा टीजर सलमान खानने सोशल मीडियावर शेअर केला होता.

दिशा पटाणी देखील अली अब्बास जफर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘भारत’ चित्रपटामध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. सलमान खानच्या विविध भूमिका या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. सलमान खान तारुण्यापासून तर वृद्ध अवस्थेपर्यंत दिसणार आहे. त्याच्या तारुण्याच्या काळात दिशा पटाणी त्याच्या सोबत या चित्रपटात दिसणार आहे.

या गाण्याचा टीजर सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करुन ‘लाईफ स्लो मोशन मे जाने वाली है’, असे कॅप्शन दिले होते. चाहते देखील हे गाणे पाहण्यासाठी उत्सुक होते. नुकताच या गाण्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या गाण्याला ‘आज डुब जाऊ तेरे आँखो के काजल मे स्लो मोशन मे’, असे कॅप्शन दिले आहे. सलमान आणि दिशाचा धमाकेदार डान्स या गाण्यात पाहायला मिळत आहे. ‘भारत’ हा चित्रपट ‘ईद’च्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल. सलमान खान सध्या त्याच्या ‘दबंग-३’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘दबंग-३’च्या सेटवरीलही अनेक फोटो तो चाहत्यांशी शेअर करत असतो.

Leave a Comment