सोमण दाम्पत्यांनी शेअर केला एक अनसीन व्हिडिओ

milind-soman
2018 मध्ये गर्लफ्रेंड अंकिता कोनवार हीच्याशी फिटने फ्रिक, मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणने लग्नगाठ बांधली. सोमवारी (22 एप्रिल) त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले. या कपलने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक अनसीन व्हिडिओ शेअर केला. सोबतच रोमँटिक कॅप्शन या व्हिडिओला देत त्यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अंकिता आणि मिलिंदचे लग्नही एक वर्षापूर्वी वयातील अंतरामुळे फार चर्चेत राहीले होते.


मिलिंद सोमणने लग्नातील विधींशी निगडीत असलेला हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले, मागील एक वर्ष खूप सुंदर होते पण तुझ्याएवढे सुंदर नाही. अंकिता नेहमी अशीच आनंदी राहा. तर हाच अनसीन व्हिडिओ अंकितानेही आपल्या इस्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओला तिने, मागील एक वर्ष आनंदाने भरलेले राहिले, मला एका अशा व्यक्तीची सोबत मिळाली ज्याचे मी नेहमी स्वप्न पाहिले होते. माझ्यासोबत तुझे असणे माझ्या जगाला आणखी सुंदर बनवते. माझा प्रत्येक दिवस तू अधिकाधिक सुंदर बनवतोस, असे कॅप्शन दिले.


मिलिंद आणि अंकिताच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये ते दोघंही लग्नाच्या विधी पूर्ण करताना दिसत आहेत. त्यांच्यामधील रोमँटिक केमिस्ट्री यावेळीही पाहायला मिळत आहे. दोघेही लग्नाच्या पोशाखात खूप सुंदर दिसत आहेत. लग्न, संगीत आणि मेहंदीच्या विधी या व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्यात आल्या आहेत. यावेळी मिलिंद आणि अंकिता डान्स करताना दिसत आहेत. त्याच्या या व्हिडिओवर चाहते त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
milind-soman1
मागील वर्षी 22 एप्रिलला मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार यांनी लग्न केले. मिलिंद त्यावेळी 53 वर्षांचा तर अंकिता 27 वर्षांची होती. या दोघांनी पारंपरिक रितीरिवाजानुसार लग्न केल्यानंतर 11 जुलै 2018ला स्पेनमध्ये ‘barefoot wedding’ केले होते. अंकिताही मिलिंदप्रमाणे फिटनेस फ्रिक असून सोशल मीडियावर हे कपल खूप सक्रिय असलेले दिसून येते.

Leave a Comment