गाण्याच्या माध्यमातून शाहरुखने केले मतदानाचे आव्हान

shahrukh-khan
आज देशभरात लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी देशभरात मतदान होत असून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदान करण्यासंबधी अनेक स्तरातुन आवाहन करण्यात येत आहे. यात शाहरुखनेही आपल्या हटके स्टाईलमध्ये चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्याने मतदारांना एका गाण्याच्या माध्यमातुन मतदान करण्याचे महत्व पटवुन सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याच्या या प्रयोगाचे कौतुक केले आहे.


हे गाणे शाहरुखने स्वत: गायले आहे. हे गीत तनिष्क बागची आणि अब्बी व्हायरल यांनी लिहिले आहे. हे गाणे तयार करण्यासाठी मी जरा उशीर केला असला, तरी मतदानासाठी तुम्ही मात्र उशीर करू नका, मतदान फक्त आपला हक्क नाही, तर ही आपली शक्ती आहे, त्या शक्तीचा वापर करा, असे कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिले आहे.

शाहरुखच्या या व्हिडिओची प्रशंसा करत नरेंद्र मोदी यांनी त्याच्या गाण्याचेही कौतुक केले आहे. खूप चांगला प्रयत्न आहे. मला पूर्ण विश्वास आहे, की भारताची जनता तुमचे आवाहन ऐकतील. तसेच, मोठ्या संख्येने मतदान करतील, असे ट्विट त्यांनी केले आहे. मोदींनी निवडणुकीपूर्वी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना ट्विटरवर टॅग करुन मतदारांना आवाहन करण्यास सांगितले होते.

Leave a Comment