त्वचेसाठी गुणकारी वेलदोडा

Cardamon
वेलदोडा किंवा इलायची हा मसल्याचा पदार्थ घराघरात हटकून सापडणारा आहे. वेलदोडा एखाद्या पदार्थाला उत्तम स्वाद आणि सुगन्ध देणारा असतानाच हा मसाल्याचा पदार्थ त्वचेच्या आरोग्यासाठी देखील गुणकारी आहे. वेलदोड्याचा वापर करून त्वचेशी निगडीत अनेक समस्या नाहीशा करता येतात. जर चेहऱ्यावर सतत मुरुमे, पुटकुळ्या येत असतील, काळसर डाग येत असतील, तर ही समस्या दूर करण्यासाठी वेलदोड्याचा वापर करता येतो. शरीरामध्ये टॉक्झिन्स किंवा विषारी घटक साठत राहिल्याने त्वचेवर मुरुमे किंवा पुटकुळ्या येऊ लगतात. वेलदोड्याच्या नियमित सेवनाने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होत असून, वेलदोड्यामध्ये जीवाणू प्रतिरोधक घटक मुबलक प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळे वेलदोड्याच्या नियमित सेवनाने अनेक प्रकारच्या स्किन अॅलर्जी निवळण्यास मदत होते. तसेच यामुळे त्वचेचा पोत उजळण्यासही मदत होते.
Cardamon1
थंडीच्या दिवसांत आणि अनेकदा उन्हाळ्याच्या दिवसांत ही ओठ कोरडे पडून त्यांवर बारीक चिरा पडतात. अनेकदा कोरडेपणामुळे ओठांतून रक्त ही येऊ लागते. ही समस्या दूर करण्यासाठी थोड्याशा लोण्यामध्ये किंवा साजूक तुपामध्ये वेलदोड्याची पूड मिसळावी आणि हे मिश्रण ओठांवर चोळावे. हा उपाय दिवसातून दोन वेळा करावा. थोड्याच अवधीमध्ये ओठांचा कोरडेपणा दूर होईलच शिवाय ओठांवर आलेला काळसरपणा दूर होऊन ओठांची रंगतही सुधारण्यास मदत होईल.
Cardamon2
वेलदोड्याची पूड आणि मध हे मिश्रणही त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम समजले जाते. वेलदोड्याचे दाणे मिक्सरवर बारीक करून घेऊन त्यांची पूड करावी आणि त्यामध्ये मध मिसळावा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग नाहीसे होण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावर वारंवार मुरुमे येत असल्यास ही समस्या देखील दूर होते. या उपायाचा अवलंब करण्यासाठी हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावावे. हे मिश्रण रात्रभर चेहऱ्यावर राहू देऊन सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment