अंडी उकळलेल्या पाण्याचा करा असा उपयोग

egg
अंडी ही प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. तसेच मानवी शरीराला आवश्यक असलेली अनेक जीवनसत्वे आणि क्षारही अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे सर्व ताज्या भाज्या, फळे यांच्या जोडीने अंड्यांचा समावेश आहारामध्ये आवर्जून करण्याचा सल्ला आहारतज्ञ देत असतात. त्यामुळे उकडलेले अंडे हे अनेक जणांच्या, विशेषतः वाढत्या वयातील मुलांच्या आहाराचा भाग असतेच. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळच्या भुकेसाठी अंडी उकडल्या नंतर अंडी उकळलेले पाणी आपण टाकून देत असतो. पण ज्याप्रमाणे अंड्याचे सेवन मानवी शरीराच्या तंदुरुस्तीसाठी उपयुक्त असते, त्याचप्रमाणे ज्या पाण्यामध्ये अंडी उकडली जातात ते पाणी देखील आपल्या घरातील किंवा बागेतील झाडांसाठी उपयुक्त ठरू शकते.
egg1
अनेक जण आपल्या झाडांच्या मुळांशी अंड्याची टरफले किंवा ही टरफले बारीक चुरून त्याची पावडर टाकत असतात. या टरफलांच्या माध्यमातून झाडांना योग्य वाढीसाठी आवश्यक असे कॅल्शियम मिळत असते. त्याचप्रमाणे ज्या पाण्यामध्ये अंडी उकडली असतील ते पाणी देखील कॅल्शियम आणि क्षारांनी परीपूर्ण असून हे पाणी झाडांना घातल्याने झाडांना कॅल्शियम आणि क्षार मिळत असतात. मात्र हे पाणी झाडांना घालण्यापूर्वी ते निवू द्यावे आणि मगच झाडांना ते घालावे.
egg2
या पाण्यामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि क्षारांच्या मुळे, एरव्ही कमी वाढ असलेल्या झाडांची चांगली वाढ होऊ लागते. या पाण्यामुळे झाडाची मुळे बळकट होतात. हे पाणी झाडांसाठी खताप्रमाणे काम करत असते. त्यामुळे झाडांच्या पोषणासाठी इतर खते वापरतानाच त्याला या पाण्याची जोड दिल्याने झाडांना योग्य ते पोषण मिळू शकते. त्यामुळे अंडी उकळल्यानंतर ते पाणी टाकून देता ते थंड करून घरातील झाडांना घालावे.

Leave a Comment