अजय देवगणाच्या ‘दे दे प्यार दे’मधील आणखी एक गाणे तुमच्या भेटीला

ajay-devgan
लवकरच ‘दे दे प्यार दे’ चित्रपटातून अभिनेता अजय देवगण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजयसोबतच या चित्रपटात तब्बू आणि रकुल प्रीत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटातील गाणे आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

या गाण्याचे तु मिला तौ हैं ना, असे शीर्षक आहे. रकुल आणि अजयची रोमँटिक केमिस्ट्री आणि धमाल मस्ती गाण्यात पाहायला मिळते. अरिजित सिंगने आपल्या आवाजाने या गाण्याला अधिक खास बनवले आहे. तर कुणाल वर्मा यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि अमाल मलिकने संगीत दिग्दर्शन केले आहे.

प्रेक्षकांना या चित्रपटात पूर्वाश्रमीची पत्नी आणि २४ वर्षांनी लहान गर्लफ्रेंड यांच्यात अडकलेल्या अजयची कथा पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अकिव अली यांनी केले आहे. त्याचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तर भूषण कुमार, क्रिशन कुमार, लव्ह रंजन आणि अंकुर गर्ग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Leave a Comment