उत्तर प्रदेशातील मतदारात महाभारतातील पात्रांची भरमार

voters
देशात सध्या विविध राज्यात लोकसभेसाठी मतदान घेतले जात असून अनेक ठिकाणी मतदान पार पडले आहे. देशातील सर्वाधिक लोकसभा सीट असलेल्या आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशात मतदार याद्या तपासताना निवडणूक आयोगाला मजेशीर बाब दिसून आली आहे. ती म्हणजे या मतदार याद्यात महाभारतातील पात्रांच्या नावांची भरमार आहे.

उत्तर प्रदेश मतदार यादीत जवळजवळ साडेसहा लाख मतदार कृष्ण नावाचे आहेत. तर गीता नावाच्या ३० लाख महिला आहेत. धृतराष्ट्राला युद्धभूमीचे वर्णन बसल्या जागेवरून करणारा संजय या नावाचे २६ लाख ७० हजार मतदार आहेत तर अर्जुनाची संख्या ९ लाख २० हजार इतकी आहे. भीम २ लाख ९ हजार आहेत. आजकाल द्रौपदी हे नाव फरचे प्रचलीत नाही तरीही उत्तर प्रदेश मतदार यादीत ९५९६६ द्रौपदी आहेत. पाण्डवातील मोठा आणि राजा बनलेला युधिष्ठीर नावाचे १६२२५ मतदार आहेत.

पांडवांचे गुरु द्रोणाचार्य या नावाचे १४२२ मतदार आहेत तर पितामह भीष्म नावाचे २३२५३ मतदार आहेत. दुर्योधन नावाचे ६२३११ मतदार आहेत. नकुल सहदेव या नावाच्या मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. अभिमन्यू भरपूर आहेत. मथुरेत राधा या नावाच्या तसेच मोहन आणि कृष्ण नावाचे मतदारांची संख्या प्रत्येकी ९ हजाराहून अधिक आहे.

यामागे असे कारण सांगितले जाते कि काही दशकांपूर्वी ग्रामीण भागात नवजात बालकांना देवी देवांची नवे ठेवणे शुभ मानले जात असे. दोन दशकांपूर्वी शिव, गौरी, मीरा अशी नावे ठेवण्याचे प्रमाण अधिक होते त्यानंतर राहुल, पूजा, नेहा अश्या नावांची क्रेझ आली आणि आता ऐकायला वेगळी अशी विवान, जीव, मायरा अशी नावे ठेवली जात आहेत.

Leave a Comment