‘स्टुडंट ऑफ द ईअर 2 मधील पहिले गाणे तुमच्या भेटीला

student-of-the-year
काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला स्टुडंट ऑफ द ईअर 2 या चित्रपटाचा ट्रेलर आला. आता यापाठोपाठ चित्रपटातील पहिले गाणेही रिलीज करण्यात आले आहे.

या गाण्याचे ‘ये जवानी हैं दिवानी’ असे शीर्षक असून टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या तिघांचा जबरदस्त डान्स गाण्यात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. किशोर कुमार यांनी १९७२ मध्ये गायलेल्या ‘ये जवानी हैं दिवानी’ गाण्याचेच हे रिक्रिएट व्हर्जन आहे.

चित्रपटाच्या पहिल्या भागातील ‘डिस्को दिवाने’ गाण्याची हे गाणे पाहताच आठवण आल्याशिवाय राहत नाही. आता या बॉलिवूडच्या नव्या विद्यार्थ्यांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हा चित्रपट मे महिन्यात १० तारखेला प्रदर्शित होणार आहे. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Comment