शरद पवारांचा यामुळे निवडणुकीतून काढता पाय – नरेंद्र मोदी

narendra-modi
अकलुज – बुधवारी सोलापूरमधील अकलूज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतली. त्यांनी या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. एसीमध्ये बसून अंदाज व्यक्त करणाऱ्यांना प्रत्यक्षात काहीच माहीत नसते. पण शरद पवार यांनी मैदान का सोडले हे माझ्या लक्षात अकलूजमधील सभेसाठी झालेली गर्दी पाहून आले. शरद पवारही राजकारणातील मोठे खेळाडू आहेत, त्यांना हवेचा अंदाज अचुक येतो. स्वत:च नुकसान ते होऊ देत नाहीत, म्हणूनच निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

मंगळवारी महाराष्ट्र, गुजरात आणि अन्य काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. काहींना यात आपले प्राण गमवावे लागले. तर यात शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. मी अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी निर्देश दिले असल्याचे मोदींनी सभेच्या सुरुवातीला सांगितले.

देशात एक मजबूत सरकारची आवश्यकता २१ व्या शतकात भारताला नवीन उंचीवर नेण्यासाठी आहे. एक मजबूत नेता भारतासारख्या देशात हवा असून जनतेने २०१४ मध्ये मला बहुमत दिले. मी या बहुमतामुळेच कठोर निर्णय घेऊ शकलो. गरीबांच्या विकासासाठी काम करु शकलो, असे मोदींनी सांगितले. माढ्यातील नागरिकांना मजबूत देश हवा की मजबूर देश हवा, हे त्यांनीच सांगावे. देशाला काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची ‘महामिलावट’ कधीच मजबूत बनवू शकत नसल्याचेही, त्यांनी म्हटले आहे.

आम्ही आता हल्ला झाल्यावर घरात घुसून मारतो. तुम्हाला भारताची ही नवी भूमिका योग्य वाटते ना, असा सवाल त्यांनी सभेत आलेल्या लोकांना विचारला. काही विरोधकांना हीच गोष्ट पटत नाही. पण त्यांच्या प्रयत्नांना तुमचा हा चौकीदार कधीही यशस्वी होऊ देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment