या कारणाने सलमान नेहमीच घालतो काळ्या रंगाचे कपडे

salman-khan
नेहमीच आपल्या कूल स्टाइलसाठी बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान ओळखला जातो. तो अनेकदा जीन्स आणि टी-शर्टमध्ये दिसतो. फार कमी वेळा सलमान फॉर्मल कपडे किंवा जीन्सवर टी-शर्टमध्ये दिसतो. पण तरीही अनेकजण त्याच्या स्टाइलचे चाहते आहेत.
salman-khan1
पण एक गोष्ट नेहमी त्याच्या स्टाइलमध्ये हायलाइट होते, ती म्हणजे सलमानचे कपडे अनेकदा काळ्या रंगाचे असतात. पण नुकताच एका डिझायनरने हा रंग निवडण्याच्या मागेसुद्धा एक कारण असल्याचा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर डिझायनर ऐशले रेबेलोने चाहत्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली. एका युजरने यावेळी त्याला प्रश्न विचारला, सलमानची स्टाइल बदला, तो नेहमी काळे कपडेच का वापरतो.
salman-khan2
या प्रश्नाचे उत्तर ऐशलेने मजेशीर अंदाजात दिले. त्याने लिहिले, कारण दुसरा कोणताही रंग सलमानला आवडत नाही. सलमानच्या चाहत्यांना तो काळे कपडे का वापरतो याचं उत्तर ऐशलेच्या या खुलाश्यामुळे मिळाले आहे. तसे या गोष्टीत काहीच शंका नाही की सलमानला काळा रंग खूप शोभून दिसतो. सलमानच्या ‘भारत’ चित्रपटाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे. ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीली येणार आहे. तसेच सध्या सलमान त्याचा आगामी दबंग 3 या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Leave a Comment