अर्जुन कपुरच्या ‘इंडियाज मोस्ट वान्टेड’चा टीजर रिलीज

arjun-kapoor
अभिनेता अर्जुन कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘इंडियाज मोस्ट वांन्टेड’ या चित्रपटाचा टीजर ‘नो गन्स ओन्ली गट्स’ अशी दमदार टॅगलाईन देऊन रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असणार आहे. एक दमदार भूमिका साकारण्यासाठी अर्जुन सज्ज झाल्याचे आता टीजरमध्येही पाहायला मिळत आहे.

अर्जुन कपुर अॅक्शन आणि क्राईम थ्रिलर असलेल्या या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. अर्जुन भारताला हवा असलेला सर्वात क्रुर गुन्हेगार ज्याचे नाव ‘इंडियाज ओसामा’ असे आहे, त्याला पकडण्यासाठी सज्ज होताना या टीजरमध्ये दिसते. राज कुमार गुप्ता हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओज अंतर्गत करण्यात आली आहे. २४ मे २०१९ ला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment