‘कलंक’मधील ‘अैरा गैरा’ गाणे तुमच्या भेटीला

kalank
अवघ्या काही दिवसांनी करण जोहरचा बहुचर्चित ‘कलंक’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटातील नवनवीन गाणी गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता अशात नुकतेच या चित्रपटातील आणखी एक गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे ‘सैया मेरा अैरा गैरा’ असे बोल आहेत.

अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या जबरदस्त डान्सची झलक या गाण्यात पाहायला मिळत आहेत. तर तिच्यासोबत वरूण आणि आदित्यही ठुमके लगावताना दिसत आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या गाण्याची लिंक वरूणने शेअर केली आहे. यासोबत आज पुरा इंडिया नाचेगा, असे कॅप्शनही त्याला दिले आहे.

या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. आलियाचे कथक नृत्य याआधी प्रदर्शित झालेल्या ‘कलंक’मधील घर मोरे परदेसीया गाण्यात पाहायला मिळाले होते. वरूणचे जबरदस्त ठुमके ‘फर्स्ट क्लास’ गाण्यात तर ‘तबाह हो गए’मधील माधुरीच्या अदांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती.

Leave a Comment