‘मार्व्हल अॅव्हेन्जर्स एन्डगेम’ चा नवा टिझर पाहिला आहे का?

Marvel-Avengers-Endgame
अवघ्या काही दिवसातच हॉलिवूडचा ‘मार्व्हल अॅव्हेन्जर्स एन्डगेम’ हा यावर्षीचा बहुप्रतिक्षीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मार्व्हल्सचे चाहते शेवटी हा गेम कोण जिंकणार, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटाचा नवा टिझरही नुकताच रिलीज करण्यात आला आहे. थॉन्सवर वार करण्यासाठी अॅव्हेन्जर्सची दोन गटात विभागणी होणार असल्याचे या टीझरमधून दिसून येते.

अॅव्हेन्जर्स एकत्र मिळून जगाला वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. अॅव्हेन्जर्सचा कॅप्टन टिझरमध्ये त्यांना सूचना देताना दिसत आहे. त्यांनी गेल्या १० वर्षांत प्रदर्शित केलेल्या प्रत्येक सुपरहिरो चित्रपटाला भारतीय प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली होती. ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ हा माव्‍‌र्हलचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सुपरहिरो चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. भारतीयांनी अगदी मनापासून तब्बल २०० कोटी रुपयांची कमाई केलेल्या या सुपरहिरो चित्रपटाचे कौतुक केले होते. या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ची आता चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment