जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ संकुल नागरिकांच्या स्वागतासाठी सज्ज

Jewel-Changi-Airport
सिंगापूर – नागरिकांच्या स्वागतासाठी जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ संकुल सज्ज झाले असून आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना काल त्याची झलक दाखवण्यात आली आहे. आतापर्यंत त्याची प्रतिकात्मक छायाचित्रेच होते. 17 एप्रिल पासून सर्वांसाठी ज्वेल चांगी विमानतळाचा परिसर खुला होणार आहे. जगातील सर्वात मोठा धबधबा वास्तुरचने अंतर्गत अनुभवता येतो. या धबधब्याचे पाणी 130 फूट उंचीवरुन कोसळते. सुमारे 8 हजार कोटी रुपये विमानतळाच्या नूतनीकरणावर खर्च आला आहे.
Jewel-Changi-Airport1
चांगी एअरपोर्ट ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार विमानतळाचे एकूण क्षेत्रफळ 1.30 लाख चौरस मीटर आहे. हे विमानतळ संकुल दहा मजली आहे. त्यापैकी 5 मजले जमिनीवर तर जमिनीत 5 मजले आहेत. येथे 280 व्यापारी गाळेही आहेत. प्रवाशांसाठी चेक-इनची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. 150 आसनांची व्यवस्था आहे. 130 कॅबिनचे हॉटेलही आहे. छतावर जलतरण तलाव, चित्रपटगृहे, शॉपिंगची उत्तम सोय आहे.

या विमानतळावर चार मजली उद्यान असून त्याचा आराखडा नामांकित वास्तुविशारद मोशे सफ्दी यांनी तयार केला आहे. 2014 पासून संकुलाच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले होते. चांगी जगातील सर्वात व्यस्त सातवे विमानतळ आहे. 2018 मध्ये येथील चार टर्मिनलचा 6 कोटी 56 लाख प्रवाशांनी वापर केला. टोकिया, द.कोरियातील इंचेऑननंतर याचा तिसरा क्रमांक लागतो.

Leave a Comment